Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Online Application mahadbtmahait.gov.in:-
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल बोरिंगसाठी २० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २० हजार रुपये, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, सुक्ष्म व ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपये किंवा तुषारसाठी २५ हजार आणि परसबागेसाठी ५ हजार रुपये, तसेच पीव्हीसी व एचडीपीई पाइपसाठी ३० हजार रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यांवर देण्यात येतात.
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Agriculture Department of Aurangabad Declared the Selection List of Various Taluka under the Aurangabad District. Candidate name is available in the below given attachment and their complete details mention in the front of their name. Candidates click on the respective Taluka and open the pdf file. Candidate now able to check their approve package for agriwell.
Eligibility Criteria
- लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
Yojana Subsidy Benefits
- नविन विहीर.
- जुन्या विहीरीची दुरूस्ती.
- शेततळयाचे नविन प्लास्टीक आस्तरीकरण.
- बोअर.
- वीज जोडणी आकार.
- तुषार सिंचन.
- ठिबक सिंचन.
- पंप संच.
अ.क्र. | बाब | अनुदानाची मर्यादा (रुपये) |
१ | नवीन विहीर | २,५०,०००/- |
२ | जुनी विहीर दुरुस्ती | ५०,०००/- |
३ | इनवेल बोअरींग | २०,०००/- |
४ | पंप संच | २५,०००/- |
५ | वीज जोडणी आकार | १०,०००/- |
६ | शेततळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण | १००,०००/- |
७ | सूक्ष्म सिंचन संच | परीच्छेद ७ मध्ये नमूद मंत्री मंडळ उपसमतीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार |
Important Documents
- जातीचे प्रमाणपत्र.
- जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा.
- उत्पन्नाचा दाखला (1,50,000 च्या आत असावे ).
Related:- Maharashtra Government Schemes
Farm Lining / power connection size / pump set / micro irrigation set:
- सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
- तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
- जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
- तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत).
- ग्रामसभेची शिफारस/मंजूर.
- शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
- काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह).
- विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र.
- प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.